Thursday, September 23, 2010

The Blue Mug- I


व्हेज लबाबदार... नावावरून काय वाटतं हो?
वाचताक्षणी हि एक मांसाहारी नसलेली गोष्ट असावी एवढंच वाटलं. मग हि भाजी आहे, चटणी आहे, एखादा पराठ्याचा प्रकार आहे कि एखाद्या लहानश्या आणि रुबाबदार दिसणाऱ्या अश्या शाकाहारी प्राण्याच नाव आहे
याचा घोळ काही कळत नाही. हा, पण आता एखाद्या हॉटेलात हे नाव वाचायला मिळालं तर शेवटचा पर्याय कटला याच समाधान ... अन भुकेनं व्याकूळ असताना हे नाव वाचलं तर जिभेला सुटलेल्या लाळेला हॉटेल च्या स्वयंपाक्यान चव पुरवावी एवढीच माफक अपेक्षा!

तसंच The Blue Mug हे नाव वाचून, जादा विचार न करण्यासारखी एखादी गोष्ट असावी एवढंच वाटलं मला. म्हटलं Jaguar ची कोणतीतरी नवीन उत्पादनं असतील किंवा Nescafe चा नवीन branding funda .

पण निघालं एका नाटकाचं नाव. आता मात्र झाली पंचाईत. नाटकाचा विषय काय असेल यावर विचार करता करता वैश्विक तापमान वाढीचे समुद्रावरील परिणाम किंवा यमुनेच्या निळ्या पाण्यात बुडत असलेला कॉमन वेल्थ गेम चा चषक किंवा आकाशातील पऱ्याची पृथ्वी भेट किंवा कृष्ण आणि शकुनी यामधील संघर्ष किंवा अगदीच एखाद रहस्यमय नाटक असावा असं वाटलं.
शेवटी आपला मित्र गुगळे शोध (Google search हो!! ) याच्या खांद्यावर थोडा विसावा घ्यावा म्हटलं. त्याने साथ तर दिली...पण
बरोबरीने बरेच अवजड संदर्भ सुध्धा.

कोणा एका अतुल कुमार (नक्कीच भैय्या असणार हा!) महाशयांनी लिहिलेलं व दिग्दर्शित केलेलं हे नाटक! Oliver Sack नावाच्या मेंदुतज्ञ महाशयांनी , एका टोपीमुळे (ती कुणाची होती बरं...) पती-पत्नी मध्ये झालेल्या वादावर लिहिलेला निबंध वाचून, हे नाटक लिहिलंय म्हणे कुमार साहेबांनी. (पुन्हा भैया...दुसऱ्याच्या डोक्यावर (इथे मेंदूवर!!), वादावर, पाय ठेवून, कष्ट करून, नवीन काहीतरी तयार). म्हटलं काहीतरी खिचडी असणार हि. ज्यांना खूपच भूक लागली आहे त्यांना खाऊदे हा पदार्थ म्हणून निघणारच इतक्यात म्हटलं काय काय घातलंय या The Blue Mug खिचडीत ते तरी बघावं आणि इथेच अडकलो. बरेच आवडते पदार्थ... विनय पाठक, रजत कपूर, शिबा चढ्ढा, रणवीर शोरी. म्हटलं भैयाच असेना का हॉटेल, पण वास तर मस्त येतोय आतून...चव घेऊन बघावी. आणि शेवटी साक्षात कोको उर्फ कोंकना सेन-शर्मा चं नाव!











आयला...आतापर्यंत जरा जास्तच विचार केला!
प्रत्यक्ष रंगमंचावर....अगदी समोर... सर्वाना perform करताना बघायला मिळणार याची ओढ वाढली
आणि अशा प्रकारे स्वारीचे घोडे पृथ्वी कडे वळले...

हा The Blue Mug कशाने भरलाय हे आता पाहूनच सांगेन...